Wed. Apr 21st, 2021

S.K WORLD NEWS

TODAY NEWS ONLY

बालमृत्यू रोखण्यासाठी सिद्धिविनायक मंदिराचा पुढाकार; जाणून घ्या काय करणार आहेत…

1 min read

मुंबई ः  कोरोनाच्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना येणाऱ्या पुढील आव्हानांबरोबरच आदिवासी बांधवांबद्दल चिंता व्यक्त केली. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील आदिवासी बांधव आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून शासन पाऊल उचलत आहे.  या सर्व परिस्थितीत शासनाला मदत केली जावी, या हेतूने सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाकडून पुढाकार घेण्यात आला आहे. 

वाचा ः शाब्बास योद्ध्यांनो… मुंबईतील पोलिसांनी केली कोरोनावर यशस्वी मात

या पार्श्वभूमीवर आदिवासी भागातील बालमृत्यू रोखण्यासाठी महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्.ये लसीकरण करण्याचा निर्णय सिद्घिविनायक गणपती मंदिर न्यास विश्वस्तांनी घेतला आहे. पालघर,नंदुरबार,नाशिक, अमरावती ,गडचिरोली या  5 जिल्ह्यातील बालमृत्यूची समस्या लक्षात घेऊन तातडीने आदिवासी भागातील 0 ते 1 वर्ष या वयोगटातील मुलांचे लसीकरण करून बालमृत्यू रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाला मदत करण्याचा निर्णय श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यास विश्वस्तांनी घेतला आहे. 

वाचा ः मुलाचे लग्न साधेपणाने करत कोव्हिड योद्ध्याने सहकाऱ्यांसाठी केला 'हा' उपक्रम 

1.41 लाख बालकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ठ
पालघर,नंदुरबार,नाशिक, अमरावती, गडचिरोली या 5 जिल्ह्यातील 0 ते 1 वयोगटातील अंदाजे 1.41 लाख बालकांना पहिल्या टप्प्यात या लसीचे लसीकरण करता येईल. आरोग्य विभागाच्या अभ्यासानूसार, “न्युमोकोकल” हि लस बालक 9 महिने पूर्ण होईपर्यंत 3 टप्प्यात द्यावी लागते. 5 जिल्ह्यासाठी अंदाजे 4.62 लक्ष डोसची आवश्यकता भासणार आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानूसार, न्युमोकोकल हि लस 4 डोसेसच्या व्हायलमधे ऊपलब्ध असून प्रति व्हायलची किंमत अंदाजे 800 रूपये इतकी आहे. त्यानुसार, बालमृत्यू रोखण्यासाठी आदिवासी बालक लसीकरण योजनेसाठी 10 कोटी रूपयांचा निधी देण्याचा निर्णय न्यास विश्वस्तानी घेतला असून हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता. विभागाने अध्यादेश जारी केला केला असून आरोग्य सेवा यांच्याकडे हा निधी लवकरच सुपूर्द करण्यात येईल, असे ही श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाकडून सांगण्यात आले आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *