Thu. Apr 22nd, 2021

S.K WORLD NEWS

TODAY NEWS ONLY

कोव्हिड केअर सेंटरमध्ये अहोरात्र सेवा; मात्र दोन महिन्यांपासून मानधनच नाही….

1 min read

मुंबई : मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने केरळमधून डॉक्टर आणि नर्सेस बोलवल्या होत्या. काही दिवस काम केल्यानंतर वेतनाच्या मुद्द्यावरून केरळचे पथक माघारी परतले आहे. त्याशिवाय मुंबईत उभारलेल्या विविध कोव्हिड केअर सेंटरमध्ये आरोग्यसेवा देण्यासाठी मुंबईतील खासगी डॉक्टरांना आवाहन करण्यात आले होते. मात्र सेवा देणाऱ्या डॉक्टरांना दोन महिन्यांपासून मानधनाची प्रतिक्षा आहे.

लॉकडाऊनमध्येही दिलासादायक बाब; कौटुंबिक हिंसाचारात झाली मोठी घट… 

केरळमधील डॉक्टर मानधन न मिळाल्यामुळे परत गेल्यास काही दिवस होत नाहीत, तोच कोव्हिड केअर केंद्रात उपचार करणाऱ्या वीस डॉक्टरांना अद्याप आपल्याला मानधन मिळाले नसल्याची तक्रार केली आहे. वरळीच्या एनएससीआय येथील केंद्रात काम करणारे हे डॉक्टर मानधनासाठी अनेकांशी संपर्क साधत आहेत. कोव्हिड केअर केंद्रातील या डॉक्टरांनी किमान पंधरा दिवस सेवा केली आहे. त्यातील काहींनी तर एक महिना काम केले आहे. त्यातील काहींना मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात तर काहींना जूनच्या पहिल्या आठवड्यात काम थांबवण्यास सांगितले. यातील बहुसंख्य डॉक्टरांची भायखळा, वरळी, दादर परिसरात खासगी दवाखाने आहेत.
  
अभिनेत्री रसिका दुग्गलच्या नृत्यावर तुम्हीही थिरकणार; वाचा सविस्तर…

केंद्रात काम न करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला होता. त्यामुळे केंद्रात काम करण्यासाठी या डॉक्टरांनी आपली खासगी प्रॅक्टीस बंद ठेवली होती. आम्हाला काम करण्याशिवाय पर्यायच नव्हता, असे या डॉक्टरांनी सांगितल्याचे वृत्त आहे. या केंद्रात एमबीबीएस तसेच बीएएमएस डॉक्टर होते. एमबीबीएस डॉक्टरांना 80 हजार तर बीएएमएस डॉक्टरांना 50 ते 60 हजार रुपये प्रति महिना मानधन देण्याचा निर्णय झाला होता. 

यशस्वी वैमानिक होऊन बापाचं कर्ज फेडणाऱ्या 'या' महिलेची यशोगाथा नक्की वाचा

एनएससीआयमध्ये दहा आयसीयू बेडसह एकंदर 528 बेड होते. तिथे 300 रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यातील आयसीयू बेडवर कायम रुग्ण होते. आता पुन्हा या केंद्रातील रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, या केंद्रावर काम केलेल्या डॉक्टरांनी जी साऊथ कार्यालयाशी सातत्याने संपर्क साधला आहे. या कार्यालयात आमच्या कामाचा तपशीलही नाही, असे आम्हाला सुरुवातीस सांगण्यात आले. वरिष्ठ आधिकाऱ्यांना भेटल्यानंतर आम्हाला बँक खात्याचे तपशील देण्याची सूचना करण्यात आले. ते सर्वांनी दिल्यानंतरही अद्याप रक्कम जमा झालेली नाही, असा दावा डॉक्टरांनी केला. 

कोरोनाबाधितांची घुसमट थांबणार! वाशीच्या प्रदर्शन केंद्रातील 500 खांटांचे ऑक्सिजन सुरू…

एनएससीआयमधील केंद्रातील अधिष्ठाता डॉ. राजीव जोशी यांनी सर्व डॉक्टरांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. त्यासाठीची सर्व प्रक्रिया सुरु आहे. त्यांना आम्ही मदत करण्यास तयार आहोत, असे सांगितले. डॉ. तात्याराव लहाने यांनीही काही दिवसातच सर्व प्रक्रिया पूर्ण होईल असेच नमूद केले.
—-
संपादन : ऋषिराज तायडे

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *